महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सायबर (Maharashtra Cyber) विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सायबर गुन्ह्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वाची मोहीम राबवली जात आहे. यादरम्यान नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती देऊन त्यापासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असतात. याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी व नागरिकांना सतर्क करण्यासाठी महाराष्ट्र सायबरने विशेष व्हिडिओ जारी केला आहे, जो काळजीपूर्वक पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जर कधीही कोणतीही सायबर फसवणूक किंवा आर्थिक गैरव्यवहार झाल्यास, कोणत्याही विलंबाशिवाय खालील माध्यमांवर संपर्क साधावा
राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक: १९३०
अधिकृत संकेतस्थळ: www.cybercrime.gov.in
सायबर सुरक्षिततेबाबत नियमित अपडेट्स आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र सायबरच्या खालील अधिकृत सोशल मीडिया पेजसना भेट द्या किंवा फॉलो करा:
इन्स्टाग्राम:
फेसबुक:
एक्स (ट्विटर):
यूट्यूब:
महत्त्वाचा संदेश: सतर्क राहा, सुरक्षित राहा!