नवी मुंबई, दि. ७ नोव्हेंबर :
ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या पारंपरिक दिवाळी फराळाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद अभियानांतर्गत विशेष दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील CBD बेलापूर येथील अर्बन हाट येथे ३ ते ७ नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण महिला बचत गटांच्या माध्यमातून चकली, लाडू, करंजी, चिवडा यांसारखे पारंपरिक पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत असून महिला आर्थिक सक्षमीकरणालाही प्रोत्साहन मिळत आहे.
