निवृत्तीवेतनधारकांसाठी काल 'डिजिटल जीवन प्रमाणपत्र' मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 


 

अमरावती, दि.६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): वरिष्ठ कोषागार कार्यालय, अमरावती यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी (पेन्शनर्स) डिजिटल जीवन प्रमाणपत्र  ऑनलाईन सबमिट करताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि ही पद्धत सोपी व सुलभ व्हावी, या उद्देशाने शुक्रवार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता अमरावती येथील कोषागार कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात एका विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या मार्गदर्शन सत्रासाठी जिल्ह्यातील  निवृत्तीवेतनधारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कोषागार अधिकारी, (निवृत्ती वेतन) अमोल इखे यांनी केले आहे.

 

या मार्गदर्शन सत्रात  ऑनलाईन डिजिटल जीवन प्रमाणपत्र नेमके कसे सादर करावे, याची सविस्तर आणि प्रत्यक्ष माहिती या दिली जाणार आहे. हे प्रमाणपत्र वेळेत सादर न झाल्यास निवृतीवेतन मिळण्यात अडचण येऊ शकते, त्यामुळे हे सत्र निवृत्तीवेतनधारकांसाठी  फायद्याचे ठरणार आहे. मार्गदर्शन सत्रास उपस्थित राहणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक, पेन्शन बँक पासबुक, आधार कार्ड, आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणणे बंधनकारक आहे.


أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday