अंजनगाव सुर्जी येथे २८ नोव्हेंबरपासून 'वाह जिंदगी वाह' विनामूल्य विशेष शिबिराचे आयोजन

अंजनगाव सुर्जी:-

अंजनगाव सुर्जी येथे २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ दरम्यान 'वाह जिंदगी वाह' या चार दिवसीय विनामूल्य विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
 या शिबिरात मुंबई येथील प्रख्यात मोटिव्हेशनल स्पीकर, लाइफ कोच आणि कॉर्पोरेट ट्रेनर प्राध्यापक ई. व्ही. गिरीश उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
हे शिबिर २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६:३० ते रात्री ८:३० या वेळेत पार पडणार आहे.
वॉटर सप्लाय ऑफिसजवळ, नरेंद्र नगर, विठ्ठल मंदिरासमोर, अकोट रोड, अंजनगाव सुर्जी.
 या शिबिरासाठी प्रवेश पूर्णपणे निःशुल्क (मोफत) ठेवण्यात आला आहे.
'हर पल को खुशनुमा बनाने के लिए दिल से कहो... वाह जिंदगी वाह' या संकल्पनेवर आधारित या शिबिरात खालील महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे:
  • तणावमुक्त जीवन 
  • संबंधांमध्ये मधुरता
  • आरोग्य तुमच्या हातात
  • परम सत्तेचे ज्ञान
  • राजयोग मेडिटेशन
या चार दिवसीय शिबिरासोबतच ७ दिवसीय राजयोग मेडिटेशन अनुभूती शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक नागरिकांनी अधिक माहिती व नोंदणीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा:
ब्रह्माकुमारीज, लोटस हाऊस, गणपती नगर, अंजनगाव सुर्जी
शांती कुंज, द्वारका चौक, सुर्जी, अंजनगाव
या प्रेरणादायी व जीवनोपयोगी शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने बी.के. दुर्गादीदी, बी.के. गजेंद्रभाई आणि बी.के. शुभांगीदीदी यांनी केले आहे.
Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday