*२८ व २९ नोव्हेंबरला महात्मा फुले विचार साहित्य संमेलन*



 अमरावती दि. २५  महात्मा जोतिराव फुले यांच्या  द्विशताब्दी जन्मोत्सव वर्षा निमित्त महात्मा फुले पुण्यतिथीला दिनांक २८ व २९ नोव्हेंबर रोजी गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट राधानगर अमरावती, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, महात्मा फुले द्विशताब्दी जन्मोत्सव समिती, मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती व इतर समविचारी संघटनांच्या वतीने  महात्मा फुले विचार साहित्य संमेलनाचे आयोजन मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती येथे करण्यात आले आहे.

संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध लेखक, समीक्षक व विचारवंत डॉ.श्रीकांत तिडके हे असून संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध पत्रकार व संपादक श्रीमंत माने हे करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर हे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख, खासदार बळवंतराव वानखडे ,आमदार सुलभाताई खोडके साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रमोद मुनघाटे प्रभाताई गणोरकर ,श्रीपाद अपराजित विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष विकास दाते, मराठा सेवा संघाचे राज्य सचिव चंद्रशेखर शिखरे व उपाध्यक्ष अरविंद गावंडे इत्यादी मंडळी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन प्रसंगी अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस पद्मश्री जनार्दन पंत बोथे यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट  व जगद्गुरु तुकोबारा साहित्य परिषदेचे अध्यक्ष  डॉ. सतीश तराळ  आहेत. संमेलनाच्या निमंत्रक   प्राचार्य डॉ. स्मिताताई देशमुख आहेत.


सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी निघणार असून सकाळी नऊ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार केले जाणार आहेत यात प्राचार्य राजाभाऊ महाजन, निर्मलाताई सावरकर, सुदर्शनजी गांग, एम.टी. नाना देशमुख, प्राचार्य भोजराज चौधरी, प्रा. श्रीकृष्ण बनसोड, युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी पवन नालट, शंकरराव घोरसे, विठ्ठल कुलट, प्रवीण बोपुलकर, शाम ठक, हिम्मत ढाले, प्रा. महादेव लुले यांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी डाॅ राज यावलीकर, डॉ. शोभा गायकवाड, छाया पाथरे, इत्यादिंच्या पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे. महात्मा फुले यांचे क्रांतिकार्य या विषयावर सकाळी ११ ते १ या वेळेत होणाऱ्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. काशिनाथ बऱ्हाटे  राहणार असून या परिसंवादात प्रा. विजया मारोटकर, प्रा. राजेश मिरगे, प्रा. प्रेमकुमार बोके, संतोष अडसोड ,जयंत झंझाळ भाग घेणार आहेत.

दुपारी २ ते ४ या वेळात होणाऱ्या दुसऱ्या परिसंवादाचा विषय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे वांङमय दर्शन असा असून परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मराठी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ.कोमल ठाकरे  राहणार आहेत. या परिसंवादात श्री गोपाल कडू डॉ. गणेश चव्हाण डॉ. योगिता पिंजरकर प्रा. अनिल प्रांजळे हे सहभागी होणार आहेत. दुपारी चार ते सहा या वेळात होणाऱ्या पहिल्या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शोभा गायकवाड राहणार असून या कवी संमेलनात सुनील यावलीकर, राजेश महल्ले ,प्रा. राजू शिंदे प्रा. अरुण बुंदेले, गजानन मते, नीता कचवे, प्रा. दिनेश राऊत, प्रा. रणजीत गणोदे, गणेश खडके, सुनील लव्हाळे, बबलू कराळे, गणेश साखरे, शीतल राऊत, छाया पाथरे, सुरेखा धर्माळे, संदीप देशमुख, प्रमोद पंत, संदीप विजयराव देशमुख ,सुरेश देशमुख, विवेक सपकाळ, नरेंद्र विझे, सिमरेला देशमुख, प्रा. दिलीप साखरे, सीमा भार्दुले,मंजू वासनीक हे कवी सहभागी होणार आहेत. रविवार दिनांक २९ नोव्हेंबरला सकाळी ९ ते ११ या वेळात तिसरा परिसंवाद होणार असून परिसंवादाचा विषय महात्मा फुले यांचे वाङ्मय आशय अभिव्यक्ती आणि मूल्यदर्शन असा आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ सतीश तराळ राहणार असून या परिसंवादात डॉ. अलका गायकवाड डॉ. प्रवीण बनसोड डॉ. प्रमोद गारोडे प्रा. संदीप तडस हे सहभागी होणार आहेत. दुपारी ११ ते १ या वेळात मा.विलास सिंदगीकर नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली  होणाऱ्या कथाकथनाचे सूत्रसंचालन प्रा.  राजेंद्र राऊत करतील यात  प्रा. संघमित्रा खंडारे, अ.भा. ठाकूर, विनोद तिरमारे, प्रा. मोहन काळे, बबन महामुने डॉ.मंदा नांदूरकर , प्रा. नेहा भटकर हे कथालेखक सहभागी होणार आहेत. दुपारी २ ते ४ या कालावधीत दुसरे कवीसंमेलन होणार असून कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राज यावलीकर राहणार आहेत. या कवी संमेलनात प्रा. सुखदेव ढाणके, प्रा. अशोक थोरात, विष्णू सोळंके, प्रा. अरुण सांगोळे ,प्रा. हेमंत खडके, अनंत नांदुरकर, नितीन भट, नीलिमा भोजने ,कृष्णकुमार चांदेकर, प्रकाश आमले, गौतम गुडघे ,प्रा. गजानन घोंगटे, प्रा. अजय खडसे, राजा धर्माधिकारी, विजय सोसे, सुनिता तायडे ,संजीवनी काळे, वर्षा धाबे, जयश्री कोटगीरवार, साईनाथ रहाटकर, रामदास कोरडे ,मधुराणी बनसोड, कांचन उल्ले, प्रा. ममता म्हस्की- राऊत हे कवी सहभागी होणार आहेत. दुपारी ४ते ६ या वेळात साहित्य संमेलनाचा समारोप होणार असून याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार अनिल बोंडे साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसिद्ध समीक्षक प्रा. प्रमोद मुनघाटे संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रा. डॉ.मोना चिमोटे, ज्ञानविज्ञान संस्थेचे संचालक  प्रा. डॉ. केशव तुपे , समाजसेवक सुदर्शनजी  गांग , कथाकार सुरेश आकोटकर  संत गाडगेबाबा विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्रीकृष्ण बनसोड इत्यादी मंडळी उपस्थित राहणार आहेत.

प्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराज व कीर्तन केसरी लक्ष्मणदास काळे महाराज यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार असून त्यांच्या प्रबोधनकार्याबद्दल त्यांचा सत्कार केला जाणार आहे.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार केले जातील. यात डॉ. दिलीप काळे, डॉ. गोविंद कासट,  पुरुषोत्तमराव गावंडे,  दिलीपसिंह खांबरे,  पृथ्वी सिंह राजपूत,  माधव पांडे प्रा. नरेंद्र राऊत, डॉ. मंगेश निर्मळ प्रा. प्रभाकरराव ठाकरे, श्रीमती रजिया सुलताना श्री जगदीश नाना बोंडे, प्रकाश भाऊ आवारे, ज्योती राठोड, सारिका पेठे, कुमकुम मोहोड, मानव जाधव कुमार फुलझले इत्यादींचे सत्कार केले जाणार आहेत.

या संमेलनाच्या यशस्वी ते करता मराठा सेवा संघ व त्याचे सर्व कक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ,संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळ ,उपेक्षित समाज महासंघ, कर्मयोगी गाडगेबाबा विचार मंच ,हितगुज ज्येष्ठ भगिनी मंडळ व आदिशक्ती व उद्देशीय संस्था, बोली संपदा, मराठा फ्रेंड्स क्लब,  विवेकानंद विवेकानंद वाचनालय,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जनसाहित्य परिषद, यावली शहीद सेवा समिती, क्रांती नवनिर्मिती संघटना, अमरावती जिल्हा नशाबंदी मंडळ, संत गाडगेबाबा अध्यासन संत गाडगेबाबा विद्यापीठ इत्यादी संस्था सहकार्य करीत आहेत. या संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday