तीर्थस्थळ कार्तिक स्वामी शिरजगाव कसबाला २७ नोव्हेंबरला त्रिंजठा उत्सवात लाखो भावीक येणार

 

शिरजगाव कसबा 

दिनांक २५ ( डिंगाबर सुने)

(ग्रामीण उदय  न्यूज नेटवर्क)


   विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये सातपुडा शेजारी शिरजगाव कसबा गाव वजा शहरामध्ये एका शतकापासून कार्तिक स्वामी त्रिजंठा उत्सव साजरा केला जात आहे. मराठी संस्कृतीचे भव्य स्वरूप ग्रामीण भागामध्ये या उत्सवात येथे पाहायला मिळत आहे .या कार्यक्रमाला शिरजगावात लाखो भाविक एकत्र येत आहे.

रथ फुलांनी सजवलेले सोबत अवाढव्य गरुड, डायनासोर, श्रीशंकरजी यांच्या भव्य प्रतिमा सोबत असतात हा उत्सव मोठ्या प्रमाणात येथे २७ नोव्हेंबरला साजरा होत आहे.

शिरजगाव कसबा कार्तिक उत्सव पौरानिकतेचे  प्रतीक



सातपुड्याच्या पायथ्यालगत अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस मेघा नदीच्या काठावर वसलेले शिरजगाव कसबा मध्ये सुमारे एक  शतकापासून हा कार्तिक उत्सव एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने सामुदायिक रित्या साजरा केला जात आहे. या उत्सवामागे शिवपुराणातील एक पौराणिक संदर्भ आहे. जेव्हा दैत्याचा राजा तारकासुर अतिशय उन्नमत झाला होता व देवाधिकांना त्राही त्राही करून त्याने सोडले होते.

यावर उपाय म्हणून सर्व देवता वैकुंठपतीस शरण गेले त्यावेळी ब्रह्मा व विष्णू ने सांगितले की शिव पार्वती एकत्र येऊन जो पुत्र होईल त्याच्या हस्ते तारकासूर मरेल तेव्हा शिवपुत्र कार्तिक याने अश्विन पौर्णिमेपासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत कठोर तपश्चर्याकडून तारकासुराशियुद्ध केले तारकासुराचे बाण कार्तिकीने तोंडात गींडले तसेच ब्रह्मास्त्र सर्व क्षेत्रांनीशी कार्तिकने तारकासुरासशस्त्रहीन केले व तारकासुराला पाय धरून गोलाकार फिरवून धरतीवर सापडले तेव्हा त्याचे चूर्ण झाले. पौर्णिमेनंतर तीन दिवसांनी म्हणजेच कार्तिक शून्य कार्तिक कृष्ण 3 या दिवशी तारकासुराला महिने भरातील सर्व काकडे एकत्र करून दहन केले व स्वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले म्हणून भक्तजन कार्तिक महिन्यात काकड आरती काढून कार्तिक त्रिंजठाला उत्सव साजरा करीत आहे. शिरसगाव मध्ये सार्वजनिक कार्तिक स्वामी मंडळांनी पुढाकार घेऊन ४० वर्षापासून कार्तिक स्वामी मंदिराची स्थापना केली तेव्हापासून येथे अतिशय भव्य स्वरूपाचा कार्यक्रम होत आहे.

मंदिरामध्ये वर साईबाबा चे मंदिर व भुयारामध्ये जाताना गणेश मूर्ती पंचमुखी कार्तिक स्वामीची मूर्ती विराजमान आहे व मागच्या बाजूला वाहन मोर उभा या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे साईबाबा व गणेशजीचे दर्शन स्त्रियांना घेता येते कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्यास स्त्रियांना मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश नसतो व दर्शनास मनाई आहे त्यांचा पुराणिक संदर्भ असा की, गणपतीने आपल्या मातापित्या समोर लग्नासाठी हट्ट धरला परंतु कार्तिक  मोठा असल्यामुळे पेच निर्माण झाला हा पेच सोडविण्यासाठी त्यांनी पण ठेवला की जो कोणी प्रथम विश्व परिक्रमा पूर्ण करून प्रथम येईल त्याचे प्रथम लग्न केल्या जाईल हे एकूण कार्तिकी मोर वाहणार पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास तात्काळ निघाला परंतु गणपती तेथेच थांबला व कार्तिक परिक्रमा पूर्ण करून येताना दिसताच गणपतीने आई-वडिलांभोवती एक प्रदर्शना पूर्ण करून माता पित्यांना नमस्कार केला कार्तिकेने आल्यानंतर निर्णय मागितलं तेव्हा गणपतीने विश्व परिक्रमा  सर्वप्रथम पूर्ण केली व त्याचे लग्न प्रथम होईल असे म्हटल्याबरोबर कार्तिक म्हणाला हा निर्णय चुकीचा आहे तेव्हा शंकर-पार्वती म्हणाले की जे पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजेच आई वडील विश्वस्वरूप आहे .कार्तिकेला राग आला, रागाच्या भरात स्त्री जातीला शाप दिला की जी कोणी स्त्री माझं तोंड पाहिल ती ७ जन्म पर्यंत विधवा होईल त्यामुळे कार्तिकेचे मंदिर नेहमी भुयारात असते शिरसगाव मध्ये विजयादशमीपासून कार्तिक कृष्ण तृतीयेपर्यंत मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे. यावर्षी ह.भ.प. नरेश महाराज आळंदीकर यांचे भागवत कथा प्रवचन सुरू आहे.कार्तिक मंडळाचे प्राचीन काळातील ग्रथांची पुनरावृत्ती करताना येथे दिसून येत आहे. राजराजवाडा सारखे रथ मोठ्या परिश्रमाने बनवून त्यामध्ये राम लक्ष्मण बनवून लहान मुलं बसवीत असतात प्रत्येक मंडळ आपला रथ अधिक सुंदर दिसावा याकरिता रात्रंदिवस परिश्रम करीत आहे. या  कार्यक्रमाला सर्व जाती धर्माचे लाखो भाविक विदर्भातुन दर्शणार्थ उत्सव पाहायला येत आहे.

أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday