🎖️ पद्मश्री जनार्दनपंत बोथे गुरुजीं
पद्मश्री जनार्दन बोथे गुरुजी यांचा तिवसा येथे भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माजी निजी सचिव आणि अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सरचिटणीस पद्मश्री जनार्दनपंत बोथे गुरुजी यांचा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या केंद्रीय कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या हस्ते बोथे गुरुजींचा हा विशेष सन्मान करण्यात आला.
राष्ट्रसंतांच्या विचारांचा वारसा जपत सेवामंडळाच्या माध्यमातून निरंतर कार्य करणाऱ्या बोथे गुरुजींना पद्मश्री मिळाल्याबद्दल विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रांतून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
