गावरान तूप नाही, चक्क जनावरांची चरबी!

धक्कादायक! ११ वर्षांपासून नागरिकांना खाऊ घालत होते प्राण्यांच्या चरबीचे तूप!


दि.१० खंडवा :- 

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात प्रशासनाने एका बनावट तूप बनवणाऱ्या मोठ्या कारखान्यावर धाड टाकून या किळसवाण्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 

बाजारात 'गावरान तूप' किंवा 'देशी तूप' म्हणून विकल्या जाणाऱ्या या पदार्थात दुधाचा किंवा सायीचा अंशही नव्हता. त्याऐवजी थेट जनावरांची चरबी, हाडे आणि कातडे मोठ्या कढयांमध्ये उकळून व वितळवून तुपासारखा दिसणारा अत्यंत घातक पदार्थ तयार केला जात होता. 

 हा धक्कादायक आणि आरोग्याशी खेळणारा प्रकार गेल्या ११ वर्षांपासून (२०१५ पासून) राजरोसपणे सुरू होता. 

प्राण्यांच्या चरबीपासून तयार केलेले हे विषारी आणि बनावट तूप विविध हॉटेल्स, रस्त्यावरील ढाबे आणि अगदी आयस्क्रीम बनवणाऱ्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर पुरवले जात होते. 

या कारवाईनंतर अन्न सुरक्षा विभागाने तेथील सर्व साठे जप्त केले असून नमुने प्रयोगशाळेत (Lab Testing) तपासणीसाठी पाठवले आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्राहकांमध्ये आणि खाद्य जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday