अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ : अनंत बोबडे - विदर्भ (पश्चिम ) उपाध्यक्ष , पुरुषोत्तम इंगोले - अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष , मोहन राऊत - अमरावती (पूर्व)जिल्हाध्यक्ष, महेश बुंदे - अमरावती जिल्हा (पश्चिम) उपाध्यक्ष निवड जाहीर

                                                  


दि. ३० अमरावती 

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ केंद्रीय पदाधिकार्यांची सभा अमरावती जिल्हा परिषद विश्रामगृहावर राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. 

 बैठकीमध्ये समाधानकारक संघटन कार्य नसलेल्या पदाधिकार्यांचे पद नियुक्ती रद्द करण्यात येऊन अनंत बोबडे - विदर्भ (पश्चिम ) उपाध्यक्ष , पुरुषोत्तम इंगोले - अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष , मोहन राऊत - अमरावती (पूर्व)जिल्हाध्यक्ष, महेश बुंदे - अमरावती जिल्हा (पश्चिम) उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. 
 सभेला राष्ट्रीय  कार्याध्यक्ष युसूफखान पठाण,  राष्ट्रीय  उपाध्यक्ष प्रदीप जोशी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख , राष्ट्रीय  सरचिटणीस राजेंद्र भुरे,केंद्रीय चिटणीस अशोक पवार,बाबाराव खडसे , बाळासाहेब सोरगीवकर, अरुण कुलथे , संजय तल्हार ,सुरेशसिंग मोरे ,संदीप सुने , सुधाकर टिपरे,  अनंत बोबडे , महेश बुंदे , दिनेश भटकर , मदन भाटे, सचिन ढोके, प्रकाश रंगारी , उपस्थित होते.
      बैठकीमध्ये पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन जानेवारी २०२७ मध्ये घेण्याबाबत ठरविण्यात आले आहे .
Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday