अमरावती,दि.१७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२६-२७ मध्ये पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि अमरावती विभागातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विविध वयोगटांत व वजन गटांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले. १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात अटीतटीचे सामने पाहायला मिळाले.
१७ वर्ष मुलांच्या ८८ किलो आतील वजनी गटात पुणे विभागाच्या सुजल धडांबे याने प्रथम क्रमांक पटकाविला तर नाशिक विभागाचा सौरभ महाजनने द्वितीय आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचा अनुज मंगरुळे तृतिय क्रमांक पटकाविला.मुलांच्या ९८ किलो आतील वजन गटात तुळशीदास मेगणे याने (कोल्हापूर विभाग) प्रथम, साई मिडगुळे (पुणे विभाग) द्वितीय तर सर्वेश इंगळेने (अमरावती विभाग) तृतीय क्रमांक पटकाविला.मुलांच्या ९८ किलो वरील वजन गटात आर्यन वरकड याने (पुणे विभाग) प्रथम, रोहीत कांबळे (लातूर विभाग) द्वितीय तर कृष्णा माने (नाशिक विभाग) याने तृतीय क्रमांक पटकाविला.
मुलींच्या १७ वर्ष वयांच्या ६९ किलो आतील वजन गटात साधवी चौधरी हीने (नाशिक विभाग) प्रथम, धनश्री थोरात (कोल्हापूर विभाग) द्वितीय तर सानवी बोरकर (पुणे विभाग) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ७७ किलो आतील वजन गटात अंबीका बोरुडे हिने (पुणे विभाग) प्रथम क्रमांक तर आयशा पटेल (कोल्हापूर विभाग) द्वितीय तर सौम्या चव्हाण (मुंबई विभाग) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.७७ किलो वरील वजन गटात खुशी सकपाळ हिने (मुंबई विभाग) पहिला क्रमांक पटकाविला तर सानवी जगडे (पुणे विभाग) ने द्वितीय तर प्रणिती चव्हाण ने(कोल्हापूर विभाग) तृतीय क्रमांक पटकाविला.
१९ वर्ष मुलांच्या ७१ किलो आतील वजन गटात प्रितम वोड याने(पुणे विभाग) प्रथम क्रमांक तर अभिजीत राऊत ने(छत्रपती संभाजी नगर विभाग) द्वितीय तर वैभव पाटील ने (कोल्हापूर विभाग) तृतीय क्रमांक पटकाविला. ८८ किलो आतील वजन गटात श्रेयस सूर्यवंशी याने (कोल्हापूर विभाग) प्रथम क्रमांक तर रोहीत पवार (लातूर विभाग) याने द्वितीय तर क्रीश पाटील (मुंबई विभाग) याने तृतीय क्रमांक पटकाविला. ९८ किलो वजन गटात सम्यक कांबळे (कोल्हापूर विभाग) याने प्रथम क्रमांक तर राजस शिंदे (मुंबई विभाग) याने द्वितीय क्रमांक आणि त्र्यंबक महाडीक (नागपूर विभाग) याने तृतीय क्रमांक पटकाविला. ११० किलो आतील वजन गटात पियुष आढावे (अमरावती विभाग) याने प्रथम क्रमांक तर ऋतुराज आंब्रे ने(पुणे विभाग) द्वितीय तर वेद चौगुले (कोल्हापूर विभाग) याने तृतीय क्रमांक पटकाविला. ११० किलो वरील वजन गटात श्लोक सुरळकर (अमरावती विभाग) प्रथम क्रमांकावर राहिला तर धिरेंद्र सिंग (पुणे विभाग) दुसऱ्या व इस्माईल वसीम तालीब (मुंबई विभाग) तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
१९ वर्ष मुलींच्या ६९ किलो आतील वजन गट इशान्या राऊत हिने (पुणे विभाग) प्रथम क्रमांक तर पुजा थेपेकर (अमरावती विभाग) हिने द्वितीय आणि रेणु मुडलगी ने(कोल्हापूर विभाग) तृतीय क्रमांक पटकाविला. ७७ किलो आतील वजन गटात रतीका चिंचवाडे (पुणे विभाग) हिने प्रथम क्रमांक तर दिव्या कल्याणकर ने (अमरावती विभाग) द्वितीय आणि सई करणाळे (कोल्हापूर विभाग) हिने तृतीय क्रमांक पटकाविला. ८६ किलो वजन गटात आनंदी सांगळे (नाशिक विभाग) ने प्रथम तर श्रेया गायकवाड (छत्रपती संभाजी नगर विभाग) हिने द्वितीय तर आराधित खोत (कोल्हापूर विभाग) ने तृतीय क्रमांक मिळविला. ८६ किलो वरील वजन गटात निकीता शिंदे हिने (कोल्हापूर विभाग) प्रथम क्रमांक तर श्रेया कानडे (पुणे विभाग) हिने द्वितीय आणि पुर्वा अन्नदाते (मुंबई विभाग) हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
.jpeg)

