शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी भातकुली तालुक्यात 3 हजारावर लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण

 

 


फार्मर आयडी काढण्यास ग्रामपंचायत स्तरावर पुढाकार

 

अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत भातकुली तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी महसूल,कृषी,ग्राम विकास आणि सहकार विभागामार्फत विशेष प्रयत्नातून ३ हजार ४८९ लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांना ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत संबंधित कॉमन सर्व्हिस सेंटरवर (सीएससी) नेऊन फार्मर आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच जे लाभार्थी मयत आहेत त्यांना कर्जमाफी करिता तहसील कार्यालय मार्फत वारस प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे.उर्वरित पात्र लाभार्थ्यांना तत्काळ ईकेवायसी  पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

       भातकुली तालुक्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी महसूल,कृषी, ग्रामविकास,सहकार विभागाकडून एकत्रित प्रयत्न करण्यात येत असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यास मदत होत आहे.लाभार्थ्यांना कोणतीही  अडचण असल्यास तहसील,कृषी कार्यालय,पंचायत समिती,निबंधक कार्यालयात संपर्क साधता येणार आहे.


Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday