अमरावतीत 3 नोव्हेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 'व्होरा टेक्नॉलॉजीज' कंपनीत 120 पेक्षा जास्त जागांसाठी भरती




 

अमरावती, दि. ३० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ३ नोव्हेंबर 2026 रोजी  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात 'व्होरा टेक्नॉलॉजीज लि. नागपूर' या कंपनीमध्ये उमेदवारांना 120  पेक्षा अधीक जागांची संधी  मिळणार आहे.

 

नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी या रोजगार मेळाव्याद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या मेळाव्यात व्होरा टेक्नॉलॉजीज लि कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेतील. मुलाखतीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी दिली जाणार आहे.

 

या भरती प्रक्रियेद्वारे इनसाइड सेल्स असोसिएट, इनसाइड सेल्स टीम लीडर, इनसाइड सेल्स मॅनेजर या पदाच्या 120 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत.  या पदांसाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून एम.बी.ए. पदवी धारकाला प्राधान्य असेल  किंवा उमेदवार पदव्युत्तर पदवी धारक असावा. उमेदवाराकडे उत्तम संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांनी 3 नोव्हेंबर रोजी स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईझ फोटो आणि सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह (व छायांकित प्रतींसह) केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.  याबाबत काही अडचण किंवा अधिक माहिती माहितीसाठी  दूरध्वनी क्रमांक ०७२१-२५६६०६६ / ८३०८९५६२३६ / ७६२०५६०१२५ / ८६०५६५४०२५ वर तसेच  amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येणार आहे.


Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday