राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यावर भर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 8, 2026

राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यावर भर



·      ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली सदिच्छा भेट

 


            मुंबई, दि.८: ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय, मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात आणि बंदरांच्या विकासासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

 

            मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी ससून डॉकच्या आधुनिकीकरणासंदर्भात मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती खासदार शरद पवार यांना दिली. तसेच ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ माहिती पुस्तिका भेट देऊन मत्स्य व बंदरे विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली.

 

            महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायाला अधिक बळकटी देणे, मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविणे आणि बंदरांच्या विकासाला गती देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा आणि मच्छीमारांच्या हिताचे निर्णय यांना शासनाकडून प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली.

 

            ससून डॉकच्या आधुनिकीकरणासह मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासाच्या विविध उपक्रमांची माहिती देत मंत्री राणे यांनी या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाची बांधिलकी अधोरेखित केली. या भेटीत महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाच्या भविष्यातील विकासाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण विषयांवर विचारविनिमय झाला.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages