पत्र मिळताच आंदोलन मागे
शिरजगाव कसबा
दिनांक ९ ,डिंगाबर सुने
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
शिरजगाव पानखेल जंगलातील वाघिणीच्या हल्ल्यातील शेतकरी दिनेश आवारे याचे वारसास वन विभागाने नोकरीत घेण्याचे पत्र न दिल्यास व इतर मागण्या मान्य होईल तोवर मृतकाचा अंत्यविधी करणार नाही. असे नातेवाईक व शिरजगाव शेतकऱ्यांनी वन विभागाला कळवील्यामुळे ९ सप्टेंबरला गावात तनावपूर्ण शांतता होती.
मृतकाचे वारसास वन विभाग सेवेत नोकरी देण्यात यावी .,
शिरजगाव कसबा वनविभाग वर्तुळ अधिकारी निवास ला कार्यालयाचे स्वरूप द्यावे., वन विभाग अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीला वन विभागाने कुंपण द्यावे. यामुळे वन्य प्राण्याचा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, ८ सप्टेंबर वाघिणीचा हल्ला घटना परिसर नुकसान झालेल्या शेती पिकांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. या मागण्या मान्य होईपर्यंत मृतक दिनेश चा अंत्यविधी करायचा नाही असे दिनेश आवारे यांचे नातेवाईक व शिरजगाव शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे शिरजगावात कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला होता, वन विभाग डी एफ ओ, आर एफ ओ अधिकारी यांचेसोबत सुरेखा ठाकरे माजी जि प अध्यक्ष, मनोहर सुने माजी जि प सभापती, रमेश तायवाडे भाजप तालुकाध्यक्ष चांदूरबाजार, श्रीकृष्ण आवारे,मृतक दिनेश आवारे यांचे नातेवाईक , संजय थेलकर, प्रशांत राठी शेतकरी व गावातील नागरिक परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालय गेले असता तेथे श्रीमती मोकाशे वनपरिक्षेत्रअधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार दिनेश आवारे यांचे मुलीला प्रथमता: तात्पुरते स्वरूपात व नंतर कायम स्वरूपात सामावून घेतल्याचे पत्र मिळाल्याल्यामुळे व इतर मागण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार असल्यामुळे मृतक दिनेश आवारे यांचा अंत्यविधी दुपारी २ वाजता उरकविण्यात आला आहे.