गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना घेऊन पहिली 'मोदी एक्सप्रेस' कोकणकडे रवाना - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 15, 2026

गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना घेऊन पहिली 'मोदी एक्सप्रेस' कोकणकडे रवाना


 


            मुंबई, दि. १५:  कोकणवासीयांना आपल्या गावी कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव आनंदाने व उत्साहात साजरा करता यावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून कोकणवासीयांना कोकण प्रवासाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १४ येथून पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ गणेशभक्तांना घेऊन कोकणाच्या दिशेने रवाना झाली. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी हिरवा  झेंडा दाखवून या विशेष रेल्वेला मार्गस्थ केले.


 

            यंदा या उपक्रमाचे हे १४वे वर्ष आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाची आस मनात घेऊन कोकणाकडे निघालेल्या कोकणवासीयांचा प्रवास यामुळे  अधिक सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी होणार आहे असे सांगुन मंत्री राणे यांनी प्रवाशांसोबत संवाद साधून त्यांना सुखकर प्रवास आणि गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages