* सोलर प्लांट व शेतातील केबल चोरी करणारी टोळी जेरबंद - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 22, 2026

* सोलर प्लांट व शेतातील केबल चोरी करणारी टोळी जेरबंद

 



स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ४ गुन्हे उघड, १.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त


अमरावती दिनांक २२ कार्यालय प्रतिनिधी 
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)
      अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील सोलर प्लांट व शेतातील केबल चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. 
      या कारवाईत ४ गुन्हे उघडकीस आले असून, ४५ किलो तांब्याची तार, दुचाकी व दोन मोबाईल असा एकूण १ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोरीच्या घटनांचा समांतर तपास करीत होते. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अनसिंग श्याम पवार (२०), फरिस्ता मनसजन पवार (२५) व मच्छिद्र मनसजन पवार (३०), सर्व रा. तरोडा, ता. चांदूर रेल्वे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी साथीदार ऋषो चंदन पवार (२५) याच्यासह कु-हा येथील सोलर प्लांटसह अन्य ठिकाणी केबल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

चोरीची तार रिझवान खान रहेमान खान (१९), रा. हैदरपुरा, अमरावती, या भंगार व्यावसायिकास विकल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात कु-हा, चांदूर रेल्वे व मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक  तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रोहित कुदळे, गजेंद्र ठाकरे, सुधीर बावणे, चेतन दुबे, सचिन गायधने व चालक नईम शहा यांच्या पथकाने केली आहे..
यामध्ये १.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages