एमपीएससीचे नवनियुक्त सदस्य सतीश वाघोले यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 8, 2026

एमपीएससीचे नवनियुक्त सदस्य सतीश वाघोले यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ

 

 

            मुंबई दि. ८: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झालेले सतीश बबन वाघोले यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.


 

            महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३१६ मधील खंड (१) अन्वये राज्यपालांनी सतीश बबन वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

 


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सतीश बबन वाघोले यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

 

            यावेळी आयोगातील सदस्य तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages