मनोहरराव सुने यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, August 5, 2026

मनोहरराव सुने यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा


शिरजगाव कसबा दिनांक ६

(ग्रामीण उदय  न्यूज नेटवर्क)



३ ऑगस्ट मनोहरराव सुने यांचा वाढदिवस पत्रकार सहकारी पतसंस्था कार्यालयात पतसंस्था कर्मचाऱ्यातर्फे कार्यक्रम संपन्न झाला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते जयसिंग ठाकूर  होते.

   यावेळी सीईओ नंदकुमार पोकळे , शाखा व्यवस्थापक सुनील राऊत, कर्ज व्यवस्थापक ओमप्रकाश निचत, शाखा व्यवस्थापक अंकुश खाजोने, सागर याऊल, चंदू कपले ,सचिन मंडवे, सतीश आवारे हजर होते. 


अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण राज्यभरात जिल्हास्तरावर वृक्ष लागवड कार्यक्रम द्वारे वाढदिवस साजरा केला आहे.

* सांध्यदैनिक संपादक राहुल कविटकर यांच्यातर्फे वृक्ष लागवड करिता रोपे वाटप करण्यात आले आहे.


बहुउद्देशीय शासकीय नीमशासकीय कर्मचारी संघाद्वारे वृक्ष लागवड करिता रोपे वाटप करून शिरजगावात कार्यक्रम साजरा केला आहे. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक सुधीर बदुकले अध्यक्षस्थानी होते तर माजी केंद्रप्रमुख प्रमोद कुऱ्हाडे, शिक्षक किशोर यावुल, प्रमोद लाडोळे, सुनील जावरकर, सचिन दातीर, अजय सुने, पत्रकार पतसंस्था सीईओ नंदकुमार पोकळे , सांध्य दैनिक संपादक राहुल कविटकर हजर होते.

भारतीय जनता पार्टी चांदूरबाजार वतीने संपन्न झालेल्या कार्यक्रमात सौ. सुरेखाताई दामेधर,माजी जी.प. सदस्य कार्यक्रम अध्यक्षांनी होत्या

      प्रमुख पाहुणे भाजप चांदूर बाजार अध्यक्ष रमेश तायवाडे, हर्षल धुळे, विधानसभा प्रमुख संजय थेलकर, माजी प.स. सदस्य  विलास दामेधर, उपसरपंच सुरेश सातपुते, संजय कोसे, साहेबराव अस्वार, मोंटूभाऊ दाभाडे, सागर शिरभाते, भूषण दाभाडे, प्रफुल निचत, देवेंद्र निमकर,मनोज राजस, दीक्षित खाजोने, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages