तक्षशिला महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, August 17, 2026

तक्षशिला महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एनसीसी पथकाने दिली मानवंदना, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचे स्मरण



अमरावती,  ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क 


श्याम नगर येथील श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ट्रस्टचे विश्वस्त डॉ. राजेंद्र गवई यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त महाविद्यालयाच्या परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. सकाळी ७.४५ वाजता एनसीसीच्या पथकाने शिस्तबद्ध संचलन व प्रात्यक्षिक सादर करीत मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. प्रितेश पाटील, हिंमत ढोले, डॉ. रविंद्र तायडे, डॉ. नवल पाटील, डॉ. संदीप हाडोळे, डॉ. सनोबर कहकशा, डॉ. वर्षा गावंडे, डॉ. प्रणाली पेठे, डॉ. प्रवीण वानखडे, डॉ. रुपेश बेलसरे, डॉ. आनंद देशमुख, निरूपमा भोरे, मोनाली पाटील, सचिन कुमरे आदी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी डॉ. राजेंद्र गवई यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, महापुरुष आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले. भारताचे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतहसत फासावर जाणे पसंत केले. त्यांच्या असीम त्याग, साहस आणि संघर्षामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिन हा केवळ ध्वजारोहणाचा किंवा उत्सवाचा दिवस नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे ही आजच्या पिढीची जबाबदारी असल्याचेही डॉ. गवई यांनी नमूद केले. एनसीसी पथकाच्या शिस्तबद्ध सादरीकरणाने आणि राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे स्मरण, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प अशा वातावरणात तक्षशिला महाविद्यालयातील स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रा. उज्वला सुटे, प्रा. पीयुष ठाकरे, प्रा. कोमल मनोहरे, प्रा. स्वाती गवई, प्रा. सुकेशनी गवई, प्रा. रोहिणी इंगळे, प्रा. आंतिमा प्रजापती, प्रा. साक्षी पवार, प्रा. अंजली देव, प्रा. प्रियंका पवळे, प्रा. स्वराली ठाकरे, प्रा. अश्विनी पंडित, प्रा. साक्षी चवरे, प्रा. समीक्षा किरखडे, प्रा. रुतीका जावरकर, प्रा. भाग्यश्री वैद्य, प्रा. अनिल मनोहर, प्रा. विकी बाभूळकर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सुजाण नागरिक बनण्याचे आवाहन

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माधुरी फुले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मिळालेले स्वातंत्र्य जपणे आणि देशाची एकता, अखंडता व सुरक्षितता कायम राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षण घेऊन थांबू नये, तर सुजाण व जबाबदार नागरिक बनून देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. स्वच्छता राखणे, कायद्याचा सन्मान करणे, सामाजिक सलोखा जपणे आणि एकमेकांचा आदर करणे या मूल्यांचा अंगीकार केल्यास देश अधिक सक्षम बनेल. प्रत्येक विद्यार्थ्याने देशहिताला प्राधान्य देत आपली जबाबदारी पार पाडावी, असेही डॉ. फुले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

                                                            -----------------

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages