प्रधानमंत्री पिक विमा योजनेला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ



कृषी विभागाचे शेतकऱ्यांना तातडीने अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती,दि. ६:   नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी कृषी विभागामार्फत 'प्रधानमंत्री पिक विमा योजना' राबवण्यात येत आहे. खरीप हंगाम सन २०२६ साठी या योजनेतील सहभागास सुरुवात झाली असून आजअखेर ८३ हजार ६०५ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

यापूर्वी पीक विमा काढण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ ही निश्चित करण्यात आली होती. मात्र, केंद्र शासनाने १ ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी १० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यात सध्या पीक विमा नोंदणी वेगाने होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेवटच्या दिवसात पीक विमा पोर्टलवर तांत्रिक ताण येऊन अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अंतिम मुदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. तसेच अर्ज करण्यासाठी निर्धारित प्रीमियमपेक्षा अतिरिक्त पैसे मागितल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभाग किंवा तहसील कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.


Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday