NEET पेपर लीकचा दणका: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, July 25, 2026

NEET पेपर लीकचा दणका: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!


देशव्यापी विद्यार्थी आंदोलनापुढे झुकले सरकार; शिक्षण मंत्र्यांचे पद सोडले.

दिल्ली  दि. २५ :-

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा निर्णय त्यांनी देशातील वाढत्या विद्यार्थी आंदोलनांच्या आणि राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे.

 नीट (NEET-UG) परीक्षेत झालेल्या कथित घोटाळ्यामुळे आणि पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. 

 या घोटाळ्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरसह देशाच्या विविध भागांत महिनाभरापेक्षा जास्त काळ तीव्र विद्यार्थी आंदोलने सुरू होती. 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि इतर विद्यार्थी संघटनांनी त्यांचा राजीनामा मागितला होता. 

विरोधी पक्षांनी संसदेत आणि संसदेबाहेर सरकारला घेरले होते व केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपले राजीनामा पत्र पोस्ट केले आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केले. पत्रात त्यांनी खालील गोष्टी नमूद केल्या आहेत: 
देशविरोधी शक्ती जंतर-मंतरवरील परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नयेत म्हणून हा निर्णय घेतला आहे.
देशातील तरुण पिढीचा संभ्रम वाढू नये आणि देशाची एकात्मता टिकून राहावी यासाठी आपण पायउतार होत आहोत.
विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये आणि त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे हाच यामागील उद्देश आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आंदोलकांच्या प्रमुख तीन मागण्या सरकारने मान्य केल्याचे दिसत आहे
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.
शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करणे.
पेपर लीकच्या मानसिक तणावामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देणे. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages