जिल्हास्तर सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेत सहभागासाठी 21 जुलैपर्यंत नोंदणीचे आवाहन: - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 21, 2026

जिल्हास्तर सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेत सहभागासाठी 21 जुलैपर्यंत नोंदणीचे आवाहन:

 


जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आवाहन

अमरावती, दि.२१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):क्रीडा व युवक सेवा संचालनालय (महाराष्ट्र राज्य, पुणे) अंतर्गत जिल्हा परिषद अमरावती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. खेळाडूंनी आपल्या संघाची नोंदणी करण्याची मुदत आज दि. 21 जुलै 2026 पर्यंत आहे.

 प्राथमिक स्तरावरील सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेपूर्वी सर्व इच्छुक संघांनी सुब्रोतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटीच्या https://www.subrotocup.in/register या अधिकृत लिंकद्वारे ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. या स्पर्धेकरिता 15 वर्षांखालील मुलांच्या गटासाठी खेळाडूचा जन्म 1 जानेवारी 2012 किंवा त्यानंतरचा असावा, तर 17 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटासाठी खेळाडूचा जन्म 1 जानेवारी 2010 किंवा त्यानंतरचा असावा. खेळाडूंनी आपल्या संघाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 21 जुलै 2026 पर्यंत विहित नमुन्यातील प्रवेशपत्र भरून करावयाची आहे. तसेच त्याबाबतचे 100 रुपये शुल्क आकारून अधिकृत पावती प्राप्त करून घ्यावी. स्पर्धेदरम्यान प्रत्येक खेळाडूकडे आधारकार्ड, वयाच्या पडताळणीसाठी जन्माचे 5 वर्षांपर्यंतचे शासकीय दाखले व विहित नमुन्यातील ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक संघासोबत जबाबदार क्रीडा शिक्षक किंवा मार्गदर्शक असणे बंधनकारक राहील. वेळेत नोंदणी झालेल्या संघांनाच पुढील स्पर्धेचे वेळापत्रक कळविले जाईल आणि वेळेवर येणाऱ्या कोणत्याही संघास प्रवेश दिला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages