अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल होणार नाहीत; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, June 2, 2026

अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल होणार नाहीत; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा.

 

दि. २:-
८० ते ८१ लाख महिला योजनेतून बाहेर (अपात्र)
 सरकारने पारदर्शकतेसाठी राबावलेल्या ई-केवायसी पडताळणीची अंतिम मुदत संपल्यानंतर राज्यातील जवळपास ८० ते ८१ लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत.
 आधी लाभार्थी महिलांची संख्या २.४३ कोटी होती, ती आता थेट १.७ कोटींवर आली आहे. मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणे किंवा पडताळणीत निकषांमध्ये न बसणे ही यामागची मुख्य कारणे आहेत.
📢 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा 
 ज्या महिला ई-केवायसी किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरल्या आहेत, त्यांच्याकडून सरकार पूर्वी दिलेले पैसे परत वसूल करणार नाही, असा मोठा दिलासा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 
पात्र असूनही तांत्रिक अडचणींमुळे ज्या महिलांचे केवायसी राहिले आहे, त्यांच्यासाठी केवायसी करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे. 
 या योजनेचा चुकीच्या पद्धतीने किंवा बनावट अर्ज करून लाभ घेणाऱ्या १४ हजार पुरुषांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून संपूर्ण पैशांची वसुली केली जाईल. 
 सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून वेळेत निधी न मिळाल्यामुळे काही ठिकाणच्या लाभार्थी महिलांचे मागील काही महिन्यांचे हप्ते थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.
 भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या पात्र महिलांची नावे चुकून वगळली गेली आहेत, त्यांची समितीमार्फत पुनर्तपासणी करून त्यांना पुन्हा न्याय दिला जाईल. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages