Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जेष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची लूट; 'NCMC' कार्डच्या नावाखाली एजंटांची लूट



दि.१५ चांदूरबाजार:-
चांदूरबाजार परिसरात एसटी महामंडळाच्या सवलत कार्ड योजनेत प्रवाशांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 नियुक्त एजंट एका कार्डधारकाकडून ₹२० ते ₹३० अतिरिक्त उकळत आहेत.
 कार्डसाठी अधिकृतपणे ₹१९९ शुल्क निश्चित असताना, एजंट लाभार्थ्यांकडून ₹२०० ते ₹२१० वसूल करत आहेत.
 सवलत मिळवण्यासाठी प्रवाशांना नवीन एनसीएमसी कार्ड (NCMC Card) काढणे बंधनकारक केले आहे.
 चांदूरबाजार बसस्थानकावरील एजंटने आतापर्यंत ५,९०० कार्ड्सवर सुमारे ₹१ लाख २३ हजार ९०० ची लूट केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगार प्रमुख प्रवीण डावरकर यांनी माहिती दिली की, प्रति लाभार्थी फक्त ₹१९९ घेणे अपेक्षित आहे.
अतिरिक्त रक्कम घेणाऱ्या एजंटला बजावले असून, त्यांना पत्र देऊन ताकीद दिली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
 जेष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला व विद्यार्थ्यांची झालेली लूट थांबवून अतिरिक्त घेतलेली रक्कम परत मिळावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments