विनंती अर्ज
प्रति,
मा. आयुक्त,अमरावती महानगरपालिका, अमरावती.
विषय : म.न.पा. अंतर्गत सफाई कामगारांना उन्हापासून संरक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत.
महोदय,
सविनय निवेदन असे की, अमरावती शहरात सध्या उन्हाळ्याची तीव्रता अत्यंत वाढलेली असून तापमान ४५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत तथाकथित कंत्राटी तसेच कायमस्वरूपी सफाई कामगार प्रखर उन्हात काम करीत आहेत.
अनेक प्रभागांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात (सुमारे ५०) कामगार उपलब्ध नसताना केवळ २० कामगारांकडूनच संपूर्ण काम करून घेतले जात आहे. त्यामुळे कामगारांवर प्रचंड ताण येत असून त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
तसेच खालील मूलभूत सुविधांचा अभाव आढळून येतो —• हजेरी व विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था नाही• शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही• उन्हापासून संरक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नाही• उष्माघात टाळण्यासाठी कोणतीही आरोग्यविषयक उपाययोजना नाही
जे कामगार अमरावती शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवतात, त्यांचे स्वतःचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. कामगारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून हे कामगार देखील अमरावती महानगरपालिका अंतर्गत येणारे नागरिक आहेत.
वेगवेगळ्या नगरपालिका व महानगरपालिका यांनी या बाबत माणुसकीच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावले उचलून कामगारांसाठी सावली, थंड पिण्याचे पाणी, विश्रांती केंद्र, सुरक्षात्मक साहित्य व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, हे आपणास अवगत असेलच. अमरावती महानगरपालिकेनेही याबाबत तातडीने प्रभावी निर्णय घेणे आवश्यक आहे.
तसेच प्रशासनाकडून याबाबत कोणते निर्णय घेण्यात आले आहेत व त्यांची अंमलबजावणी कोणत्या स्तरावर आहे, यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्हाला लवकरात लवकर भेटीसाठी वेळ द्यावा, ही नम्र विनंती. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना द्याव्यात व आपण स्वतः प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी.
म्हणून आपणास विनंती आहे की —• सर्व प्रभागात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे• सावली, पिण्याचे पाणी व विश्रांतीची व्यवस्था करावी• सुरक्षात्मक साहित्य उपलब्ध करून द्यावे• उष्माघात प्रतिबंधासाठी वैद्यकीय सुविधा सुरू कराव्यात• तथाकथित कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करावी
आपण या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन सकारात्मक कार्यवाही कराल, ही नम्र अपेक्षा.
आपला विश्वासू,
सागर दुर्योधनसामाजिक कार्यकर्ता, अमरावतीद्वारा – महात्मा फुले नगर, नवसारी, अमरावती
प्रतिलिपी : मा. ना. पालकमंत्री, अमरावती

मा. जिल्हाधिकारी, अमरावती
मा. सहाय्यक कामगार आयुक्त, अमरावती
मा. आरोग्य विभाग, अमरावती महानगरपालिका
वरील निवेदन देण्यात आले असून या गंभीर प्रश्नावर उपाय होण्यासाठी आपण सहक्र्य करावे हि विनंती .