Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

कोरड्या विहीरीत पडलेल्या नंदीचे वाचविले प्राण एक कॉल प्रॉब्लम सॉल


खामगांव दिनांक १९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 

      गौ सेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या गौ सेवकांनी वाचविले नंदीचे प्राण. सविस्तर माहिती अशी आहे की दिनांक १६में २०२६ रोजी सावजी ले आऊट स्थित उदासी बाबा मंदिर च्या पाठीमागील भागातील खुल्या प्लॉट मधील कोरडया विहीरीत एक नंदी जखमी अवस्थेत पडलेला होता घटनेची माहिती दिनांक १७ में २०२६ रोजी सकाळी मिळताच सुरजभैय्या यादव हे काल सकाळी ८.५७ला पोहचले व दोरीच्या साहाय्याने ते विहीरीत उतरले जखमी अवस्थेत पडलेल्या नंदीला दोरी बांधून आपला जीव धोक्यात घालून त्याचा रिस्कयु केला. विशेष तो नंदी जवळ कोणाला येऊ देत नव्हता भीती पोटी कोणीही विहीरीत जाण्याची हिम्मत  करत नव्हता कारण की तो नंदी सरळ मुंडकं पुढं घेऊन सारखा मारायला अंगावर येत होता. शेवटी सुरजभैय्या यादव यांनी त्याच्यावर काबू मिळवत विहिरीतून काढून त्याची सुटका केली. या गौ सेवेत त्यांच्यासह एकनिष्ठा गौ सेवक संजय देशमुख, सचिन गायकवाड, पंकज राऊत, दारमोडे साहेब, रोहीत राऊत, पाटील साहेब, पाचपोर काका,  भांबेरे साहेब, हर्षल इंगळे आदि लोकांनी नंदीचे प्राण वाचविण्यासाठी अथक मेहनत घेऊन त्याला जिवनदान दिले. अशी माहिती रविंद्र दिपके यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments