Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

एसटी बस चालकाची अरेरावी, प्रवाशास शिवीगाळ



शिरजगाव कसबा दिनांक ७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

चांदूरबाजार बस आगाराची एसटी बस शिरजगाव मार्गे परतवाडा जात असताना बसमधील प्रवाशास बस चालक ड्रायव्हरने अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार ५ मे रोजी घडलेला आहे.

शिरजगाव कसबा येथील गोविंद निर्मळे हा पत्नी व मुलासह ५मे रोजी चांदूर बाजार येथून सकाळी ७.१५ ला शिरसगाव कसबा करिता  एसटी बसMH ४० Y ५४६० ला प्रवास करीत होता सदर बस शिरसगाव कसबा मार्गे परतवाडा जाणार होती या बस मधून शिरसगाव कसबा चे विश्व मंदिर जवळ उतरत असताना गोविंद निर्मळे यास बस चालक ड्रायव्हरने अश्लील शिवीगाळ केली आहे. प्रवाशांना चांगली वागणूक देण्याचे एसटी महामंडळाचे धोरण असताना बस चालक कर्मचारी अरेरावी करीत आहे. त्याबद्दल सदर प्रवाशांनी आगार प्रमुख चांदूरबाजार कडे तक्रार केलेली असून बस ड्रायव्हर विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments