दिनांक: ९ एप्रिल २०२६
अमरावती, दि. ९ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ‘राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून’ प्रवेशपात्रता परीक्षा दि. ०७ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली असून संबंधित उमेदवारांनी त्यात आवेदन अर्ज आता १५ एप्रिलपर्यंत सादर करावे असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
पूर्वी अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख दि. ०५ एप्रिल २०२६ होती. मात्र, कमांडंट, RIMC डेहराडून यांच्या निर्देशानुसार ही मुदत आता वाढवून दि. १५ एप्रिल २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे आयुक्त महेश चोथे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन परिषदेव्दारे करण्यात आले आहे.