Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या विकास शुल्कातील बदल तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी धर्तीवर शुल्क सवलत देण्याबाबत शासन सकारात्मक - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 


-           

मुंबई : दि.२०राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील बदल तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर शैक्षणिक शुल्क सवलत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

 

मंत्रालयामध्ये दि. १६ तारखेला राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ व २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांतील विकास शुल्कातील बदल तसेच एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर शैक्षणिक शुल्क सवलत देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारीवैद्यकीय शिक्षण विभागाचे  संबंधित अधिकारी आणि विद्यार्थी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.

 

मंत्री मुश्रीफ म्हणालेएमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांवर वाढत्या आर्थिक ताणाचा विचार करून विकास शुल्कात आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे. तसेच एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याबाबत आणि संबंधित धोरण राबविताना शासनाच्या नियमांचा व आर्थिक तरतुदींचा तसेच उच्च व तंत्रशिक्षण आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी चर्चा करुन अंतिम  योग्य तो निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत योग्य तो तोडगा काढण्यात येईल तसेच शिक्षण सुलभ आणि परवडणारे करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे श्री मुश्रीफ यांनी  सांगितले.

विविध शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील शुल्क रचनाविद्यार्थ्यांची आर्थिक पार्श्वभूमी आणि शैक्षणिक सुविधांचा दर्जा यांचा आढावा यावेळी घेण्यात आला.



Post a Comment

0 Comments