"चांदूरबाजारमध्ये निबंध स्पर्धा आणि सायबर जनजागृतीचा जागर; सुंदराबाई संस्थेचा स्तुत्य उपक्रम" - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, February 9, 2026

"चांदूरबाजारमध्ये निबंध स्पर्धा आणि सायबर जनजागृतीचा जागर; सुंदराबाई संस्थेचा स्तुत्य उपक्रम"

 


 सुंदराबाई बहुदेशिय संस्था, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व काॅम्बॅक ग्रुप चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निबंध  स्पर्धा बक्षीस वितरण व सायबर गुन्हे जनजागृती कार्यक्रम संपन्न.

चांदूरबाजार  दिनांक १०(बाबाराव खडसे (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

  सुंदराबाई बहुउद्देशीय संस्था ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व काॅमबॅक ग्रुप चांदूरबाजार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निबंध स्पर्धा विदर्भातील लोकनेते व आत्मरक्षा या विषयावरील बक्षीस वितरण तसेच सायबर गुन्हे बाबत जनजागृती कार्यक्रम चांदूरबाजार येथील गो.सी. टोम्पे महाविद्यालयातील श्री नामदेव महाराज सभागृहात  संपन्न झालेला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.मनीषाताई मनीष नांगलिया (नगराध्यक्ष) नगरपरिषद चांदूरबाजार होते तर प्रमुख अतिथी जाधव  ठाणेदार चांदूरबाजार ,सोनारकर  नायब तहसीलदार चांदूरबाजार,डायलकर आगार प्रमुख चांदुर बाजार,बाबाराव खडसे कार्यालय प्रमुख अ.भा. ग्रा. पत्रकार संघ ,मदन भाटे जेष्ठ पत्रकार चांदुर बाजार, राजाभाऊ देशमुख ज्येष्ठ पत्रकार चांदूरबाजार,रामटेके प्राचार्य गो. सी.टोम्पे चांदूरबाजार, उपस्थित होते .तर प्रमुख उपस्थिती बाळासाहेब अकोटकर,प्रदीप  शर्मा, उपस्थित होते. 

कार्यक्रमांमध्ये मोबाईल माध्यमातून होणारे गुन्हे, व सायबर क्राईम बाबत माहिती देण्यात आली असून काही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आहे.या कार्यक्रमाला चांदूरबाजार येथील महाविद्यालयातील विद्यार्थी, पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  डॉ.राहुल अहिर यांनी , संचालन कु.श्रुती कडू तर आभार प्रदर्शन माजिद इकबाल यांनी केले आहे .

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages