विशेष लेख - भारुड वारकऱ्यांनी जिवंत ठेवलेली कला - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, February 6, 2026

विशेष लेख - भारुड वारकऱ्यांनी जिवंत ठेवलेली कला



 दि. ७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

  ‌‌. एकपात्री नाट्यातून अध्यात्मा सोबत समाज प्रबोधन   

एकीकडे आधुनिकतेमुळे लोक पावत  चाललेल्याअनेक लोक कला ज्यातून समाज प्रबोधन व मानवी मनाचे रंजन एकाच वेळी होत असे ज्यामध्ये दंडार, वाघ्या मुरळी बाऱ्या वासुदेव, लावणी, शाहिरी व पोतदार यापैकी बऱ्याच लोककला ज्यातून समाज प्रबोधन व्हायचं त्या काळाच्या ओघात म्हणा किंवा लोक कलाकारांनी त्यांचा वारसा पुढे न नेल्याने त्या लुप्त पावल्या परंतु आजही काही लोक कलाकारांनी आपलं आयुष्य कलेसाठी वेचून आपला वारसा पुढे योग्य व्यक्तीला दिल्याने त्या लोककला आजही जिवंत आहे त्यापैकी प्रामुख्याने भारुड वासुदेव लावणी व शाहिरी या कला अधून मधून पाहायला मिळतात 

भारुड हे केवळ मनोरंजनाचे साधनच नाही तर त्यासोबत समाज प्रबोधनाचे फार मोठे साधन आहे भारुडास अध्यात्माची झलर लावलेले झुंबर म्हटल्यास वावगे ठरणार नाही विविधागी विविधरंगी पात्र रंगून त्यातून हसत खेळत समाजाचे प्रबोधन करण्यासोबत आध्यात्मिक सिद्धांताची मूल्ये समाजामध्ये रुजवून समाजाला धर्मानुरागी बनवणे हा भारुडाचा मूळ हेतू होय जेव्हा मनोरंजनाचे नावाखाली समाज तमाशाच्या नादी लागून पिढ्यानपिढ्या वाममार्गी जात असे तेव्हा संत एकनाथ महाराज गोसावी पैठणकर यांनी बुडत हे जन देखणे डोळा या युक्तीप्रमाणे समाजाला धर्मकार्यात लावण्यासाठी समाज प्रबोधनाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून भारुडाची रचना केली

 मला दादला नको ग बाई या भारुडातून एका व्यसनी नवऱ्याचे चित्र रंगून दारूवादी मादक पदार्थापासून होणाऱ्या हानी ची माहिती देत समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश दिला एडका मदन मदन या भारतातून अत्याधिक कामासक्तीमुळे नारद विश्वामित्र आदी संताचे कसे नुकसान झाले याचा दाखला देऊन नामस्मरण व चिंतन याकडे समाजाला लावले तर आंबे आईचा गोंधळ घालताना कुण्या गरीब मुक्या प्राण्याची बळी न देता आपल्यातील काम क्रोध मोह याचा बळी देऊन समाजाप्रती पूज्य भाव पूज्य भाव ठेवण्याची शिकवण देण्याचे कार्य अनेक भारुडातून संत एकनाथ महाराजांनी केले त्याचाच वारसा समर्थपणे वारकरी संप्रदायातील भारुडकार आजही चालवत असल्याने ही कला जिवंत आहे या कलेला राजाश्रय मिळाल्यास ही कला साता समुद्रा पार जाऊन आपली संस्कृती व वैश्विक विचार यासोबत समाज प्रबोधनाचे एक नामवंत लोकमान्य साधन म्हणून लौकिक मिळविल्याशिवाय राहणार नाही.

 शब्दांकन _

विलास खाजोने

ब्राह्मणवाडा थडी



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages