शिरजगाव कसबाचे पोलीस स्टेशन नविन ठाणेदार अमन शिरसाट - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, February 6, 2026

शिरजगाव कसबाचे पोलीस स्टेशन नविन ठाणेदार अमन शिरसाट


श्री अमन शिरसाट शिरसगाव कसबाचे नवे ठाणेदार


शिरजगाव कसबा दिनांक ६  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

येथील ठाणेदार महेंद्र गवई यांची अमरावती येथील सायबर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अमरावती अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन शिरसाट यांची शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन नवे ठाणेदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

      अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांनी ३ फेब्रुवारीला कार्यालयीन बदलीचे आदेश जारी केले आहे . शिरजगाव पोलीस स्टेशनला २ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मावळते ठाणेदार महेंद्र गवई यांनी सर्व क्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये आदर निर्माण करून सामाजिक सलोखा व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे .गावातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम  कार्तिक त्रिजटा रथउत्सव तसेच  बहिरम यात्रेमध्ये सलग दोन वर्ष कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे  व शांततापूर्ण उत्सव संपन्न करण्याचे कार्य  ठाणेदार महेंद्र गवई यांनी केले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages