शेतकऱ्यांना ग्रामीण भागात युरिया खत टंचाई_ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, February 4, 2026

शेतकऱ्यांना ग्रामीण भागात युरिया खत टंचाई_




 कृषी केंद्र धारकाचे कृषी अधिकारिंना युरिया खत विक्री  मार्गदर्शन करण्याचे निवेदन 


शिरजगाव कसबा,   डिगांबर सुने  दिनांक  ५  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील सर्व कृषी केंद्र धारक यांनी  तालुका कृषी अधिकारी प्रवीण मोहोड यांना युरिया खत विक्री बद्दल मार्गदर्शन करण्याचे लेखी स्वरुपात तारीख २ ला निवेदन देण्यात आले आहे.

गावातील शेतकऱ्यांना युरिया खत मागणीनुसार कृषी केंद्र मध्ये उपलब्ध  नसल्यामुळे परिसरातील गहू तसेच इतर पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना  आज त्यांच्या गरजेनुसार कृषी केंद्र मध्ये खतपुरवठा होत नसल्याने या सर्व शेतकऱ्यांची भटकंती सुरू झाली आहे. पिकाला वेळेवर   खत पाणी द्यायचे कसे या संकटात बळीराजा पडला आहे. गावातील कृषी केंद्रावर युरिया नाही हे बोर्ड पाहून अनेक शेतकऱ्यांच्या हातातून नुकतेच पेरलेले गहू पीक युरिया खत मिळाले नाहीतर वाया जाईल  याची चिंता सतावत आहे. गहू पेरणीच्या वेळेस ज्याप्रमाणे खताची आवश्यकता असते त्याचप्रमाणे या गहू पिकाला तिसऱ्या पाण्यासोबत पुन्हा युरिया या खताची गरज असते गावातील कृषी केंद्र संचालक यांनी शेतकऱ्यांना गरजेनुसार युरिया खताची उपलब्धता करावी अशी मागणी सध्या गावात जोर धरू लागली आहे या मागणीनुसारच कृषी केंद्र संचालक यांनी तारीख २ ला चांदूरबाजार येथील प्रवीण मोहोड तालुका कृषी गुण नियंत्रक अधिकारी यांना खत खरेदी व वितरणासंबंधी योग्य मार्गदर्शन मागितले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये युरिया खत पुरवठा करणाऱ्या कंपनी व वितरण करताना होत असलेल्या तांत्रिक अडचणी याबद्दल तालुका कृषी अधिकारी यांना अवगत केले आहे त्यांच्या दिलेल्या निवेदनामध्ये युरिया व डीएपी त लिंकिंग मध्ये येत आहे काही कंपनी युरिया कृषी केंद्रांना पाठवताना त्यांना ट्रक भाडे द्यावे लागत असल्यामुळे खताच्या निर्धारित मूल्यापेक्षा जास्त भावात कृषी केंद्र दुकानदारांना युरिया खत विकत घेण्याची वेळ आली आहे आरसीएफ ॲग्रोटेक इंडिया लिमिटेड या कंपनी व्यतिरिक्त कोणत्याही कंपनीचे कृषी केंद्र संचालक यांना युरिया खत डिस्पॅच आयडी वेळेवर मिळत नाही त्यामुळे खत विक्री करायची कसे हा प्रश्न पडला आहे खत विक्री करताना शेतकऱ्याचे पी ओ एस व मशीन वर काही शेतकऱ्यांचे ठसे जुळत नसल्याने त्यांच्याजवळ मोबाईल पण नसतो त्यामुळे युरिया खताची खरेदी करताना ओटीपी सुद्धा देऊ शकत नाही अशा शेतकऱ्यांना खत विक्री करायची कशी व तसेच शेतकऱ्यांचा सातबारा क्षेत्र पाहून शेती करायला किती रासायनिक खत द्यावे याबद्दल मार्गदर्शन कृषी अधिकारी यांनी दुकानदारांना द्यावे जेणेकरून कोणीही शेतकरी खतापासून वंचित राहणार नाही किंवा तुटवडा उद्भवणार नाही शिरसगाव कसबा हे गाव मध्यप्रदेश सीमेच्या अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे अनेक महाराष्ट्रातील शेतकरी हे मध्यप्रदेश भागातील ही शेती क्षेत्र लागवडणे पाहत आहे .त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मध्यप्रदेश मध्ये शेती करिता खत पुरवठा कसा करावा याबद्दल योग्य मार्गदर्शन कृषी अधिकारी यांनी कृषी संचालकांना द्यावे असे संयुक्त निवेदन गावातील सर्व कृषी दुकानदारांनी दिले आहे.

प्रतिक्रिया 

"परिसरातील शेतकऱ्यांच्या युरिया खताच्या मागणीला सर्व कृषी केंद्रांमध्ये खत पुरवठा एक दोन दिवसा पूर्ववत करणार तसेच  कृषी केंद्र संचालकांच्या खत विक्रीत व खरेदी संबंधी अडचणी सुद्धा जिल्हा प्रशासन स्तरावर सोडण्यात येईल अशी माहिती एम. जे. तोडकर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी दिली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages