"निसर्ग आणि इतिहासाची जुगलबंदी! 'नरनाळा महोत्सव २०२६' चा बिगुल वाजला; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, January 28, 2026

"निसर्ग आणि इतिहासाची जुगलबंदी! 'नरनाळा महोत्सव २०२६' चा बिगुल वाजला;



 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकारांचे खास आवाहन"

 दि. २९  अकोला :- अकोला जिल्हा माहिती कार्यालयाने 'नरनाळा महोत्सव २०२६' निमित्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष मोहिमेला सुरुवात केली आहे. या महोत्सवाच्या अधिकृत व्हिडिओ क्लिपसह प्रसिद्ध करण्यात  आली आहे. 

नरनाळा महोत्सव २०२६: 

कालावधी: ‘नरनाळा महोत्सव’ – इतिहास, संस्कृती व पर्यटनाचा संगम! नरनाळा किल्ल्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे जतन आणि पर्यटनवाढीस चालना देण्यासाठी हा भव्य महोत्सव ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे 

स्थळ: अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील ऐतिहासिक नरनाळा किल्ला 

व्हिडिओ क्लिप व आवाहन: जिल्हा माहिती कार्यालयाने २७ जानेवारी रोजी या महोत्सवाची अधिकृत व्हिडिओ क्लिप जारी केली . यामध्ये प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम आणि अंकुर वाढवे यांनी पर्यटकांना या महोत्सवात सहभागी होण्याचे विशेष आवाहन केले आहे 

प्रमुख आकर्षणे:

दररोज सायंकाळी 5 ते 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी लाभणार असून,

सांस्कृतिक कार्यक्रम: प्रसिद्ध गायक कैलास खेर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांचे विनोदी सादरीकरण महोत्सवाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असेल 

🔥 दुसरा दिवस – “शिवशंभो गर्जना” व रूपाली जग्गा यांचा लाईव्ह कॉन्सर्ट चे आयोजन करण्यात आले आहे.

साहसी उपक्रम: निसर्गप्रेमींसाठी जंगल सफारी, ट्रेकिंग, मॅराथॉन, चित्रकला स्पर्धा आणि वन्यजीवन छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे 

निसर्गानुभव: ताऱ्यांच्या सहवासात टेंटमध्ये मुक्काम आणि शेकोटीच्या उजेडात गप्पा ही खास सोय पर्यटकांना अनुभवता येईल 

नोंदणी आणि सहभाग

महोत्सवातील जंगल सफारी आणि इतर साहसी खेळांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे 

ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक संस्कृतीचा संगम असलेल्या या महोत्सवातून अकोला जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे 


नरनाळा महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्याचा समृद्ध इतिहास व संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रशासनाचा संकल्प असून, अधिकाधिक नागरिक व पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वर्षा मीना यांनी केले आहे.





Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages