चंद्रभानजी विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, January 14, 2026

चंद्रभानजी विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

 



स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव  - दिलीपबाबू इंगाेले

अमरावती, दि. १५:- लहान वयात विद्यार्थ्यांच्या आंतरिक सुप्त  गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे एक व्यासपीठ असून त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांची प्रतिभा पुढे येत असते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव सर्वप्रथम शालेय  स्नेहसंमेलनातूनच मिळत असताे असे प्रतिपादन श्रीराम मंदिर ट्रस्ट,कुंड सर्जापूर चे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे काेषाध्यक्ष दिलीपबाबू इंगाेले यांनी केले.

येथून जवळच  असलेल्या कुंड सर्जापूर येथील चंद्रभानजी विद्यालयाचे दाेन दिवसीय स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. त्यात उद्घाटकीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बाेलत हाेते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम मंदिर ट्रस्टचे सदस्य प्राचार्य गजाननराव इंगाेले हाेते. यावेळी ट्रस्टचे सदस्य रमेशपंत बहाळे, वसंतराव मानकर, सुधिरराव कुकडे, संजयराव मानकर, चंद्रशेखरराव मानकर, अशाेकराव मानकर, सत्कारमुर्ती व डाॅ. पंजाबराव देशमुख अर्बन काे-ऑप बँकेचे संचालक अक्षय इंगाेले, माजी मुख्याध्यापक आर.एस.गावंडे, रमेशपंत किटूकले व स्वागताध्यक्ष तथा चंद्रभानजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.टी.चव्हाण आदी उपस्थित हाेते.

सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून तसेच प्रभू श्री राम, शिक्षणमहर्षी डाॅ. पंजाबराव देशमुख, दानदाते स्व.चंद्रभानजी मानकर व विद्यालयाचे संस्थापक स्व.रावसाहेब इंगाेले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तथा दिप प्रज्वलन करून या स्नेहसंमेनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रांगाेळी स्पर्धा, हस्त व पुष्प प्रदर्शनी, गणित कक्ष याचे उद्घाटन सुध्दा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात डाॅ. पंजाबराव देशमुख बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अक्षय दिलीप इंगाेले तसेच महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्याेती सावित्र्ीमाई ुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले शाळेचे क्रीडा शिक्षक शरद वसंतराव गढीकर यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्ती अक्षय इंगाेले यांनी सत्काराला उत्तर देतांना ग्रामिण भाग असूनही शाळा ज्याप्रमाणे प्रगती करीत आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून भविष्यातही शाळेने अशीच प्रगती करावी असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी शरद गढीकर यांनी सुध्दा आपल्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे शाळेचा झालेला गाैरव असून त्यासाठी सर्वांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक एन.टी.चव्हाण यांनी शाळेच्या वर्षभरातील प्रगतिचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे संचालन आर.एस.मानकर यांनी केले. तर आभार स्नेहसंमेलन प्रभारी एस.पी.लाजूरकर यांनी मानले.

दाेन दिवसीय या स्नेहसंमेलनात विविध क्रीडा स्पर्धा, रांगाेळी स्पर्धा, हस्तकला, चित्र्कला व गणित विषयक माॅडेल, प्रश्नमंजूषा, अंताक्षरी स्पर्धा घेण्यात आल्या. तर सांस्कृतिक कार्यक्रमात या सर्व स्पर्धेचे तसेच शाळेच्या सन-2025-26 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील 3 व राज्यस्तरावरील 64 खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. अरुणा वाडेकर हाेत्या. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पालक व गावकरी मंडळीची माेठ्या प्रमाणात उपस्थिती हाेती. यावेळी आयाेजित विविध स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून कुंड सर्जापूरचे सरपंच निलेश मानकर, वनारसी गावाच्या सरपंचा ज्याेत्स्ना संजयराव माेहाेड, हातुर्णाचे सरपंच भरतरीनाथ गाैरकर, हातुर्णा ग्रामपंचायतचे सदस्य भुषण वाणे आदी उपस्थित हाेते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक एन.टी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्नेहसंमेलन प्रभारी एस.पी. लाजूरकर,व्ही.के.राठाेड, के.एस.लाजूकर, ए.पी.मांगे, आर.एस.मानकर, ए.व्ही. राजगुरे, शिक्षकेत्तर कर्मचारी सी.ए.शेंडे, आर.आर.मडावी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी, माजी विद्यार्थी, गावकरी मंडळी यांनी सहकार्य केले. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages