Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

घरकुल लाभार्थ्यांना स्वत:च्या शेतातही बांधता येणार घरकुल !


पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नवीन नियम लागू  करण्यात आले आहेत, ज्यानुसार लाभार्थ्यांना काही विशिष्ट निकषांवरच घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.
 

बांधकामाचे क्षेत्रफळ: लाभार्थ्यांना आता ६०० स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर केवळ ४८५ चौरस फूट पर्यंतच बांधकाम करण्याची परवानगी असेल.

जागेची अट: ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा उपलब्ध नव्हती, त्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र महसूल जमीन १९६६ कलम ४१ नुसार, आता शेतातही ५०० स्क्वेअर फूट जागेत घरकुल बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

निधीची स्थिती: भोकरदन तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न निधीअभावी रखडले आहे.

नवीन नियम: घरकुल बांधकामासाठी आता नवीन नियम आणि अटी लागू झाल्या आहेत, ज्यांची नोंद तलाठ्याद्वारे सात-बाऱ्यावर घेतली जाईल. 

या नियमांमुळे जागेअभावी बांधकाम न करणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. 




Post a Comment

0 Comments