एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन *१२ हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, December 31, 2025

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन *१२ हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा

 


अमरावती, दि.१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2025 येत्या रविवारी, 4 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेसाठी प्रशासनाने तयारी केली आहे.

ही परीक्षा रविवार, दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12  या एकाच सत्रात पार पडेल. अमरावती शहरामध्ये परीक्षेसाठी एकूण 41 परीक्षा उपकेंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेसाठी एकूण 12 हजार 864 उमेदवार प्रविष्ट होणार आहेत. परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 1 हजार 250 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले असून उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages