सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, December 31, 2025

सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सुरू



अमरावती, दि. 1 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी अमरावती येथील भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्रातर्फे दि. 1 जानेवारी ते 31 जुन 2026 या मुदतीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दि. 1 ते 30 जानेवारी 2026 या दरम्यान प्रवेश देण्यात येणार आहे.

सहकार विभागाने सहकारी संस्थांमध्ये काम कारणाऱ्या कर्मचाऱ्यास सहकारी व्यवस्थापन पदविका अनिवार्य केले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरूस्थ शिक्षण पद्धतीने पुर्ण करता यावा, तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये सदर पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम पोस्टल पद्धतीने सुरू केला आहे.

प्रवेशासाठी प्राचार्य, भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार प्रशिक्षण केंद्राचे भाऊसाहेब भोकरे यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages