दि.११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
सोशल मीडियावर महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय म्हणून 'महिलांसाठी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मोफत राईड योजना' सुरू झाल्याचा जो मेसेज व्हायरल होत आहे, तो चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे.
बातमीचे सत्य :
योजना महाराष्ट्राची नाही: हा मेसेज महाराष्ट्रातील कोणत्याही पोलीस विभागाने किंवा राज्य सरकारने सुरू केलेला नाही. ही योजना मूळतः डिसेंबर २०१९ मध्ये लुधियाना (पंजाब) पोलिसांनी त्यांच्या शहरातील महिलांसाठी सुरू केली होती.
काय आहे सत्य?:
व्हायरल मेसेजमधील हेल्पलाईन क्रमांक 7837018555 हा केवळ लुधियाना पोलिसांच्या मोफत ड्रॉप-होम सुविधेसाठी होता.
क्रमांक 1091 हा महिला हेल्पलाईन क्रमांक असून तो अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहे, परंतु त्यावर मोफत राईडची विशिष्ट योजना नाही.
स्थानिक पोलिसांचे स्पष्टीकरण: सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांसह, कर्नाटक, हैदराबाद आणि बेंगळुरू पोलिसांनी देखील स्पष्ट केले आहे की, अशी कोणतीही देशव्यापी किंवा राज्यव्यापी मोफत वाहतूक योजना सध्या सुरू नाही.
आपातकालीन क्रमांक: कोणत्याही आपातकालीन परिस्थितीत महिलांनी किंवा नागरिकांनी केवळ ११२ (Emergency Response Support System - ERSS) या देशव्यापी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
व्हायरल होणारा मेसेज जुना असून, त्यातील माहिती महाराष्ट्रासाठी लागू होत नाही. महिलांनी केवळ अधिकृत आणि सध्या कार्यरत असलेल्या हेल्पलाईन क्रमांकांचा (उदा. ११२) वापर करावा.
Post a Comment
0 Comments