Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शहरात कलम ३७ (१) व (३) लागू

                                              
                                           पोलीस आयुक्त (अमरावती शहर) अरविंद चावरिया



              अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

              सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून  दि. 13 नोव्हेंबर ते  27 नोव्हेंबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  अरविंद चावरिया यांनी कळविले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments