अमोल पेठे यांचा बळी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा; अवैध मुरूम वाहतुकीमुळे भीषण दुर्घटना - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 26, 2025

अमोल पेठे यांचा बळी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा; अवैध मुरूम वाहतुकीमुळे भीषण दुर्घटना





  • ब्राह्मणवाडा थडी येथे अवैध टिप्परने चिरडले अमोल पेठे यांना; नागरिक संतप्त
ब्राह्मणवाडा थडी, २७ नोव्हेंबर
चांदूरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अवैध मुरूम वाहतुकीकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर एक भीषण दुर्घटना घडली आहे. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास वेगाने जाणाऱ्या एका अवैध मुरूम टिप्परने टू-व्हीलरला धडक दिल्याने, त्यावरील अमोल पेटे या निष्पाप व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. घरातील एकमेव कमावता पुरुष गमावल्यामुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे 
घटनेचा तपशील आणि नागरिकांचा रोष:
स्थानिक माध्यमांमध्ये आणि नागरिकांकडून या अवैध वाहतुकीबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. वृत्तपत्रातून प्रकाशित झालेल्या बातम्यांमध्ये टिप्परच्या वेगवान वाहतुकीमुळे जीवितास धोका असल्याचे स्पष्ट केले गेले होते, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अखेर हा अपघात घडला.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित टिप्पर व चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी, फक्त चालकावरच नव्हे, तर या अवैध वाहतुकीला पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे .
नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
  • अवैध मुरूम वाहतूक त्वरित बंद करावी.
  • टिप्पर वाहतुकीवर वेगमर्यादा व देखरेख लागू करावी.
  • दोषींवर कठोर कारवाई करून मृतकाच्या कुटुंबास न्याय मिळावा.
ही घटना प्रशासनाच्या निष्क्रियतेची आणि उशिरा येणाऱ्या प्रतिसादाची हृदयद्रावक किंमत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे .

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages