महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: २३ नोव्हेंबरला - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 12, 2025

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: २३ नोव्हेंबरला


अमरावती, दि. १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-04 यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे आयोजन करण्यात आले असून ही परीक्षा  रविवार, दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचे नियोजित आहे.

 टेट परीक्षेच्या कार्यवाहीबाबतची सर्व अधिकृत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येत आहे. मात्र, अलीकडे युट्युब चॅनेल्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि प्रसार माध्यमांद्वारे परीक्षेसंबंधी अनेक दिशाभूल करणाऱ्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, उमेदवारांनी अशा कोणत्याही अनधिकृत माहितीवर किंवा अफवांवर मुळीच विश्वास ठेवू नये.

उमेदवार आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधीच्या सर्व सूचना आणि माहितीसाठी केवळ www.mscepune.in तसेच http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळांचेच वेळोवेळी अवलोकन करावे. कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांचे किंवा उमेदवारांचे नुकसान झाल्यास, त्याला ते स्वतः जबाबदार असतील,  असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages