'कुष्ठरुग्ण शोध अभियान' १७ नोव्हेंबरपासून सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, November 11, 2025

'कुष्ठरुग्ण शोध अभियान' १७ नोव्हेंबरपासून सुरू

 



अमरावती, दि. १२  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दिनांक 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या नियोजनासाठी अमरावती जिल्ह्याची जिल्हास्तरीय समन्वय समिती सभा जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे संपन्न झाली.

या सभेमध्ये सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. पूनम मोहोकार यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाबद्दलची सद्यस्थिती आणि या अभियानाचे विस्तृत नियोजन सादर केले. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी लवकरात लवकर कुष्ठरुग्णांचा शोध घेवून त्यांच्यावर त्वरित उपचार सुरु करण्यासाठी  सर्व उपस्थित अधिकारी तसेच  नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

 श्रीमती महापात्र यांनी समाजातून कुष्ठरोग हद्दपार करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे अपेक्षित आहे. व्यापक प्रमाणामध्ये जनजागृती करण्यात यावी, जेणेकरून कुष्ठरोग संसर्गाची साखळी समाजातून खंडित होईल आणि सन 2030 पर्यंत कुष्ठरोगाचा शून्य प्रसार हे ध्येय आपण जिल्हास्तरावर साध्य करू शकू, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे तसेच संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages