सोमवारी ‘युनिटी वॉक’चे आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, November 11, 2025

सोमवारी ‘युनिटी वॉक’चे आयोजन





*युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सोमवार, दि. 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता युनिटी वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. विमलाबाई देशमुख सभागृहातून या रॅलीला सुरवात होणार आहे. यात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पदयात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली. यावेळी मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेना, राष्‍ट्रीय सेवा योजना, आरोग्य, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मेरा युवा भारत, केंद्रीय युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘सरदार @ १५०’ एकता अभियान जिल्हास्तर युनिटी मार्च, पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही पदयात्रा विमलाबाई देशमुख सभागृहातून निघून पंचवटी चौक, इर्विन चौक येथे येणार आहे. इर्विन चौकात पथनाट्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर ही पदयात्रा गर्ल्स हायस्कूल चौक येथून निघून विमलाबाई देशमुख सभागृहात समारोप होणार आहे. पादयात्रेत सहभागी होण्यासाठी माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

पदयात्रेच्या अनुषंगाने पोलिसांची परवानगी घेण्यात यावी. तसेच पोलिस विभागाने पदयात्रेसाठी सहकार्य करावे. महापालिकेने पदयात्रेच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने पदयात्रेदरम्यान आरोग्य पथक तैनात करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्या. पदयात्रेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, खेळाडू, पोलिस भरतीतील युवक, विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच सध्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू असल्याने पदयात्रा आयोजनात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages