Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

डॉ. झाकिर हुसेनमदरसा आधुनिकीकरण योजना

 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. ६ : अल्पसंख्याक विकास विभागातर्फे डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत सन 2025-26 या वर्षाकरिता विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुकांनी विहीत नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील संवाद शाखा येथील अल्पसंख्यांक कक्षात दि. 14 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव 2 प्रतीत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. योजनेबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

मदरसे  चालवणाऱ्या संस्था धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. इच्छुक मदरशांनी 11 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णयात नमूद तरतुदीनुसार विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिक्षकांना मानधन दिल्या जाणार. पायाभूत सुविधांसाठी व ग्रंथालयासाठी अनुदान दिल्या जाणार तसेच मदरशांमध्ये राहून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिल्या जाईल.

शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त तीन डी.एड./बी. एड. शिक्षकांना मानधन देण्यात येईल. शिक्षणासाठी हिंदी/इंग्रजी/मराठी व उर्दू यार्पकी एका माध्यमाची निवड करुन त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक आहे. ग्रंथा लयासाठी तसेच शैक्षणिक साहित्यासाठी फक्त पहिल्यांदा रुपये 50 हजार व तद्नंतर प्रती वर्षी रुपये 5 हजार अनुदान देय राहील. शासन निर्णयात नमूद पायाभूत सुविधांसाठी रुपये 10 लाख अनुदान देय आहे. तसेच यापूर्वी ज्या प्रयोजनाकरीता अनुदान देण्यात आले आहे, त्या प्रयोजनाकरीता पुन्हा अनुदान देय राहणार नाही. ज्या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे, अशा मदरशांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

इच्छुक मदरशांनी शासन निर्णयानुसार विहीत नमुन्यात अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील संवाद शाखा येथील अल्पसंख्यांक कक्षात दि. 14 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव 2 प्रतीत कार्यालयीन वेळेत सादर करावा. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी http://mdd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही जिल्हा प्रशासनाव्दारे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments