Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

भातकुलीमध्ये प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

14 ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत

अमरावती, दि. १० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्य निवडणूक आयोगाने अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद (जि.प.) आणि पंचायत समिती (पं.स.) सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार भातकुली तालुक्यातील मतदारांसाठी महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, जि.प. आणि पं.स. निवडणुकीसाठी गट निहाय तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्या दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

या ठिकाणी यादी उपलब्ध: भातकुली तालुक्यातील नागरिक आणि संबंधितांना ही यादी तहसील कार्यालय, भातकुली आणि पंचायत समिती कार्यालय, भातकुली येथे अवलोकनासाठी उपलब्ध आहे.

या प्रारूप मतदार यादीवर ज्या कोणाला हरकती किंवा सूचना दाखल करायच्या असतील, त्यांच्यासाठी 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी आपल्या हरकती लेखी स्वरूपात तहसील कार्यालय, भातकुली येथे मुदतीपूर्वी सादर कराव्यात.

प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार केल्यानंतर, मतदान केंद्रांची आणि मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती भातकुली तहसिलदार यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments