केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उद्या शनिवारी दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 10, 2025

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उद्या शनिवारी दौरा


अमरावती, दि. १० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि गुरुकुंज मोझरी दौऱ्यावर येत आहे.

दौऱ्यानुसार, केंद्रीय मंत्री श्री. गडकरी हे दुपारी 12.50 वाजता श्री क्षेत्र माधान, ता. चांदूर बाजार येथे 'सक्षम' आणि श्री संत गुलाबराव महाराज संस्थानतर्फे आयोजित दिव्यांग व्यक्तींच्या सत्कार समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3.50 वाजता अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळातर्फे आयोजित गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर सायंकाळी 5.15 वाजता हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रस्थान करतील.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages