जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलन प्रतिज्ञा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, October 27, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलन प्रतिज्ञा



        अमरावती, दि. २८ : ‍जिल्हाधिकारी कार्यालयात काल  दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी अधिकारी, कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा दिली.


       यावेळी उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अधिक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांच्यासह ‍जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा असून सर्व कामे प्रामाणिकपणे करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages