Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अमरावती पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाबाबत सोडत १३ ऑक्टोबरला

अमरावती, दि. ११ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठीची सोडत सभा दि. 13 ऑक्टोबर, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या अधिसूचनेनुसार, सभापती पदाच्या आरक्षणाबाबत सदस्य आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

या निर्देशानुसार, आरक्षणाची सोडत घेण्यासाठीची विशेष सभा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे दुपारी  1 वाजता सुरू होईल. जिल्हा प्रशासनाने या सभेला संबंधित सर्व सदस्यांनी आणि इच्छुक व्यक्तींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी केले आहे.

 

 


Post a Comment

0 Comments