Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

शिरजगाव कसबा येथे भव्य सार्वजनिक कावड यात्रा आयोजन



                                        हर हर महादेव जयघोषाने दुमली शिरजगाव नगरी


शिरजगाव कसबा  दिनांक १८ ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क आहे (डींगाबर सुने)

           सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी मध्यप्रदेश  महाराष्ट्र दोन राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या मेघानदी तीरावर वसलेल्या निसर्गरम्य शिरसगाव कसबा नगरीमध्ये श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी गावातील शिवभक्तांनी भव्य सार्वजनिक कावड यात्रेच्या आयोजन केले होते शिवभक्तांनी सोमवारी पहाटे गावातील मोठा मारुतीचे दर्शन घेऊन शिरसगाव येथून ४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या देऊरवाडा त्रिवेणी संगमावर जल आणण्यासाठी असंख्य शिवभक्तांनी  पायदळ कावड यात्रेने प्रस्थान केले या  कावड यात्रेचे गावात आगमन होताच  हर हर महादेव जय घोषाने शिरसगाव नगरी दुमदुमली होती गावातील मुख्य मार्गावरून कावळ यात्रेने प्रदक्षिणा घालत  गावातील पुरातन महात्म्य लाभलेल्या खोलेश्वर मंदिर येथील शिवपिंडीवर असंख्य शिवभक्तांनी जल अभिषेक करत कावड यात्रेची सांगता करतात यावेळी शिवभक्तांना खोलेश्वर मंदिर संस्थान तर्फे महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते यावर्षी गावातील सार्वजनिक कावड यात्रा तसेच  बजरंग दल कावड यात्रा, खोलेश्वर मंदिर कावड यात्रा,  नवयुवक मंडळ कावड यात्रा  व रायझिंग सोल्जर ग्रुप कावड यात्रा  युवक युवतींनी ज्येष्ठ महिला पुरुष बालगोपाल शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता भव्य कावळ यात्रा उत्सवाला अचलपूर आमदार प्रवीण तायडे, मनोहर सुने माझी जि प सभापती , रमेश  तायवाडे तालुकाध्यक्ष भाजप, हर्षल धुळे शिरजगाव मंडळ अध्यक्ष यांनी सुद्धा  कावड यात्रेत  सहभागी  शिवभक्तांना श्रावण मास निमित्य शुभेच्छा दिल्या आहे.



Post a Comment

0 Comments